ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या मल्लांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

अकलूज- शंकरनगर-अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्थेच्या ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या मल्लांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटात 7 मल्लांनी प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्पर्धेत आपले स्थान कायम केले असल्याची माहिती संस्थेच्या कुस्ती प्रशिक्षक आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कौशल्या वाघ यांनी दिली.
यावेळी वाघ म्हणाल्या की, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील आणि ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलींना कुस्तीचे आधुनिक प्रशिक्षण मिळावे या हेतूने ताराराणी महिला कुस्ती केंद्राची स्थापना केली. या कुस्ती केंद्रातील 14 वर्षे वयोगटातील 30 किलो वजनगटात शिवानी कर्चे, 50 किलो वजन गटात सोनिया सरक, 17 वर्षे वयोगटातील 53 किलो वजन गटात नेहा गिरमे, 58 किलो वजन गटात तृप्ती जगदाळे, तर 19 वर्षे वयोगटातील 50 किलो वजनगटात काजल जाधव, 76 किलो वजनगटात वैभवी माने यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्या मल्लांचे शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील, ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष शिवदास शिंदे आदिंनी अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)