तारळे परिसरात पाच ठिकाणी घरफोडी

उंब्रज, दि. 27 (वार्ताहर) -तारळे, ता. पाटण परिसरात चार गावांना गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी लक्ष केले. चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोड्या करुन हजारो रुपयांच्या रोकडसह ऐवज लंपास केला. चोरट्यांनी बांबवडे ग्रामपंचायत कार्यालयाला लक्ष केले असून महत्वाची कागदपत्रे असणारे कपाट उचकटले. तारळे परिसरातील वाढत्या चोर्‍यांचा विषय चिंतेचा बनला असून या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी तारळेसह बांबवडे, आवार्डे, ढोरोशी, आंबळे या गावांना चोरट्यांनी लक्ष केले. बांबवडे येथील विवेक नानासो जाधव यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. पंरतु येथे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही तसेच ग्रामपंचायत कार्यालय चोरट्यांनी फोडून आतील महत्त्वाची कागदपत्रे असणारे कपाट फोडून कागदपत्रे उचकटली. ढोरोशी येथील गणपत धोंडी मगर यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील पाच हजाराची रोकड लंपास केली. तसेच शेजारील प्रथमेश अनिल मगर, तुकाराम केशव मगर, सुनील चव्हाण यांची बंदे घरे फोडून चोरट्यांनी रोकड व ऐवज लंपास केला आहे. आवार्डे येथील तानाजी देशमुख यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. आंबळे, ता. पाटण येथील एक बंद घराचे कुलूप चोरट्यांनी उचकाटले आहे. रात्री उशीरापर्यंत याबाबत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे अधिकचा तपशील समजू शकला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)