तारळी प्रकल्पाचे बांधकाम बंद पाडले

तारळी : शेतकऱ्यांनी तारळी प्रकल्पाचे काम बंद पाडले

नागठाणे, दि. 21 (प्रतिनिधी) – तारळी प्रकल्पातील बंदिस्त पाईपलाईनमुळे जमिनीखालील पाण्याच्या स्त्रोताला निर्माण झालेला अडथळा व त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याकडे दुर्लक्ष केल्याने हरपळवाडी, ता. कराड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंदिस्त कॅनॉलचे काम शुक्रवारी बंद पाडले. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येत नाही, तोपर्यंत काम सुरू करू न देण्याचा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला.
तारळी धरणापासून सांगलीकडे जाणाऱ्या बंदिस्त कॅनॉलचे काम प्रसाद कंपनीतर्फे काही वर्षांपासून सुरू आहे. जमिनीखालून जाणाऱ्या बंदिस्त कॅनॉलमुळे जमिनीखालील असणाऱ्या नैसर्गिक पाण्याच्या स्तोत्रांना अडथळा निर्माण होऊन या कॅनॉलकडे जाणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या विहीर, बोअरवेल आटल्याने पिके वाळू लागली. याबाबत 2013 मध्ये बाधित शेतकरी, शेतकरी संघटना व कार्यकारी अभियंता, कण्हेर कालवे विभाग क्र. 2 करवडी (कराड) यांच्यात कोंजावडे (ता. पाटण) येथे बैठक झाली होती. यामध्ये चर्चा होऊन भूजल सर्वेक्षण विभागाकडून सर्वेक्षण करून नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अजूनपर्यंत याबाबत भूजल सर्वेक्षण न झाल्याने व बंदिस्त कॅनॉलचे जवळपास काम पूर्णत्वास आल्याने बाधित शेतकऱ्यांच्या आश्वासनाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे शुक्रवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांनी काम बंद पाडले. आंदोलनात खोडद येथील विजय घोरपडे, नितीन देशमुख, शंकरराव देशमुख, किसन गायकवाड, समाधान जाधव, अतीत येथील संभाजी माने, सुनील जाधव, शरद जाधव, तानाजी जाधव, विशाल यादव, संतोष यादव, हरपळवाडी येथील दीपक गायकवाड, महादेव गायकवाड, धनाजी गायकवाड, रामकृष्णनगर येथील रफिक मुलाणी, सुनील काळभोर, रमेश काळभोर यांच्यासह शेतकरीवर्ग उपस्थित होता.

 


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)