तारळी प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा

पुनर्वसन प्रक्रिया गतीने राबविण्याची मागणी

सातारा,दि.4 प्रतिनिधी- आधी पुनर्वसन आणि मग धरण हा शासन निर्णय मोडून प्रशासनाने तारळी धरणाचे काम सन.2009 साली पुर्ण केले. मात्र, अद्याप प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होत नसल्याने मंगळवारी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ.प्रशांत पन्हाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

येथील बॉम्बे रेस्टॉंरट चौकातून दुपारी मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रशासनाने धरण बांधताना प्रकल्पग्रस्तां विश्‍वासात घेवून पुनर्वसनाची कामे वेगाने पुर्ण करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्याप पुनर्वसनाची प्रकिया मंद गतीने सुरू आहे.

प्रकल्पग्रस्तांचे संकलन दुरूस्तीचे व लाभ क्षेत्रातील जमीन संपादनाचे काम प्रलंबित आहे तर पुर्वी दिलेल्या जमीनी बेकायदेशीरपणे कोणतीही कल्पना न देता काढून घेतल्या जात आहेत. सातारा व पाटण तालुक्‍यातील बुडीत गावांमधील संकलन रजि.दुरूस्ती प्रलंबित असून त्यासाठी कॅम्प घेवून अंतिम केलेले रजि.त्वरित मंजूर करण्यात यावे. उपविभागीय अधिकारी, कराड यांनी पुर्वकल्पना न देता काढून घेतलेल्या जमीनी परत कराव्यात. कराड तालुक्‍यातील मायणी, निवडे, भांबे सावरघर याठिकाणी नागरी सुविधा नकाशात दाखवून ले-आऊट करण्यात यावेत, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)