तारगांव येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

तारगाव ः वृक्षारोपणप्रसंगी जयदीप लाड, साबळे, क्षीरसागर, आण्णासो निकम, कांतीलाल पाटील, सुलभा तावरे, मनिषा निकम, सुनिता पाटील आदी.

रहिमतपूर, दि. 5 (प्रतिनिधी)- तारगाव येथे भारत फोर्ज प्रा. लि, आण्णासो निकम युवा मंच व शेतकरी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीकाठावरील तारकेश्वर मंदीर परिसरात वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबवण्यात आली. झाडे लावून त्यांची जोपासना करण्याची प्रतिज्ञा घेऊन पालखीमध्ये रोपांची प्रतिष्ठापना करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पुजन करून गावात मिरवणूक काढत मंदीर परिसरात रोपांची लागण करण्यात आली.
यावेळी भारत फोर्जचे जयदिप लाड, युनियन अध्यक्ष साबळे, धामणेरचे पोलीस पाटील क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य आण्णासो निकम, सह्याद्रीचे संचालक कांतीलाल पाटील, सरपंच सुलभा तावरे, उपसरपंच सुनिता निकम, माजी सरपंच सुनिल मलवडकर, शेतकरी हायस्कूलचे मुख्याध्यापक निकम सर, दिलीप मोरे, रत्नाकर शेटे, दिलीप देशमुख, अभिजीत घोरपडे, भरत निकम, वसंतराव शिंदे, लक्ष्मण निकम, सदस्या मनिषा निकम, सुनिता पाटील, सुशील घोरपडे व ग्रामस्थ सहभागी झाले होते. झाडांच्या संरक्षणासाठी भारत फोर्ज कंपनीने शंभर संरक्षक जाळ्या पुरवल्या आहेत.
जयदीप लाड यांचे भाषण झाले. प्रशांत निकम, प्रकाश भोसले, अतुल कुदळे, ओंकार निकम, अभिजीत निकम, बंडा कणसे या युवकांनी झांडांचे संरक्षण संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. अजय निकम यांनी आभार मानले.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)