तामीळनाडूत सेल्फीच्या नादात पित्याने गमावला मुलगा…

करूर (तामिळनाडू) – सेल्फी घेण्याच्या नादात आपला चार वर्षांचा मुलगा गमावण्याचा करुण प्रसंग एका पित्यावर आला आहे. करूर येथे कावेरी नदीच्या किनारी बाबू आपल्या चार वर्षांच्या मुलाला-धनवंत ला घेऊन गेले होते. नमाक्कल जिल्ह्यातील वांगल पुलावर ही घट्‌ना घडली. मेटूर धरणातून पाणी सोडल्यामुळे कावेरी नदीला पूर आला आहे. पूर पाहण्यासाठीच बाबू धनवंतला घेऊन गेले होते.

पुलाच्या कठड्यावर धनवंतला घेउन बाबू त्याच्यासह सेल्फी घेत होते. एका हातात कॅमेरा होता, तर एका हाताने त्यांनी धनवंतला धरले होते. मात्र सेल्फीच्या नादात धनवंत हातातून सुटला आणि पूर आलेल्या नदीत वाहून गेला.

डोळ्यासमोर धनवंतला पाण्यात वाहून जाताना पाहून बाबूने आरडाओरडा केला. नंतर नदीत 15 किलोमीटर्सपर्यंत धनवंतचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो सापड्‌ला नाही. या दुर्दैवी घटनेने मोंगनूरमधील सर्वजण हळहळत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)