तामीळनाडूत शेतकरी कुटूंबातील चौघांची आत्महत्या 

चेन्नई: तामीळनाडूूत आर्थिक चणचणीमुळे शेतकरी कुटूंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जीवनयात्रा संपवलेल्यांमध्ये शेतकरी मुथुसामी, त्याची आई, 11 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलाचा समावेश आहे. चौघांनी आत्महत्या केली त्यावेळी मुथुसामीची पत्नी शेजारच्या गावात एका उत्सवासाठी गेली होती. मुथुसामीचे घर बराच काळ बंद असल्याचे ध्यानात आल्यावर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चौघांनी गळफास घेतल्याची बाब उघड झाली. मुथुसामीने शेती करण्यासाठी चार एकर जमीन कंत्राटी पद्धतीने घेतली होती. मात्र, शेतीतून त्याला अपेक्षित परतावा मिळत नव्हता. त्यातून आर्थिक बोजा वाढल्याने मुथुसामी आणि त्याच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी जीवनयात्रा संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)