तामीळनाडूच्या धर्तीवर आंध्रात अण्णा कॅंटीन

अवघ्या पाच रूपयांत मिळणार जेवण
अमरावती – तामीळनाडूच्या धर्तीवर आंध्रप्रदेशात स्वस्तात जेवण आणि नाष्टा पुरवणारी योजना सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) सरकारने 60 अण्णा कॅंटीन्स सुरू केली आहेत. त्या कॅंटीन्समध्ये अवघ्या 5 रूपयांत नाष्टा आणि जेवण उपलब्ध होणार आहे.

तामीळनाडूत माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांनी अम्मा कॅंटीनची योजना राबवली. ती योजना लोकप्रिय ठरून जयललितांना राजकीय लाभही झाला. बहुधा ते उदाहरण डोळ्यांसमोर ठेऊन टीडीपीने 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी अण्णा कॅंटीन योजना राबवण्याचे आश्‍वासन दिले. आता त्या राज्यातील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना टीडीपी सरकारने लगबग करून ही योजना सुरू केली आहे.

या योजनेचा प्रारंभ करताना आंध्रचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे प्रमुख एन.चंद्राबाबू नायडू यांनी विजयवाडामध्ये एका कॅंटीनचे उद्घाटन केले. केएफसी, मॅकडोनल्डस्‌ आऊटलेटसारखा त्या कॅंटीनच्या दर्जा आंतरराष्ट्रीय असेल, असे यावेळी चंद्राबाबूंनी म्हटले. टीडीपीचे संस्थापक एन.टी.रामा राव यांच्या नावाने मार्च 2016 मध्येच अमरावतीत पहिले अण्णा कॅंटीन सुरू करण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांत इतरत्र आणखी तीन कॅंटीन्स सुरू झाली. मात्र, आर्थिक अडचणींमुळे ती योजना राज्यभरात सुरू करण्यात टीडीपी सरकार असमर्थ ठरले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)