तामिळ अभिनेत्री नयनतारा अडकणार विवाह बंधनात ?

तामिळ अभिनेत्री नयनतारा लवकरच चित्रपट दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना नयनताराने विग्नेशचा उल्लेख होणारा पती म्हणून केला आहे.

 

नयनतारा आणि विग्नेशच्या रिलेशनशिपची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता नयनताराने जाहीरपणे स्वतःच आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. यामुळे या वर्षात हे कपल विवाह बंधनात अडकणार असल्याचे तर्क लावले जात आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नानुम राउडी धान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. नुकतेच ते यूएसमध्ये हॉलिडे एन्जॉय करतानाही दिसले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
11 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
52 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)