तामिळनाडूमध्ये पंतप्रधानांवर टीका केल्याने गायकाला अटक

नवी दिल्ली : तामिळनाडूमधील लोकगायक कोवान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारवर टीका केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. कोवान यांनी मुख्यमंत्री ई पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांच्यावरही टीका केली होती. कोवान यांना अटक झाली तेव्हा त्यांचे मित्र आणि कुटुंबियांची पोलिसांसोबत झडप झाली. त्रिची पोलिसांनी लोकांना भडकवणे तसंत शांतता भंग पाडण्याच्या उद्देशाने जाणुनबुजून अपमान करण्याच्या आरोपखाली कोवान यांना अटक केली.

कोवान यांच्यावर  कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळाची स्थापना न केल्याने करण्यात आलेल्या विरोध प्रदर्शनात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करत एक गाणे गायल होते, असा आरोप आहे. हे गाणे प्रचंड व्हायरल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी जेव्हा पोलीस कोवान यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा मित्र आणि कुटुंबियांनी अटक करण्यातं कारण विचारला असता त्यांची शाब्दिक चकमक झाली. प्रकरण हातघाई करण्यापर्यंतही गेलं होतं. पण अखेर पोलीस अटक करण्यात यशस्वी झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)