तामिळनाडूत योगेंद्र यादव पोलिसांच्या ताब्यात

तिरुवन्नामलाई,(तामिळनाडू) – तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी गेलेले स्वराज इंडिया संघटनेचे नेते योगेंद्र यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आठ पदरी मार्गाच्या विरोधातील आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी यादव आले होते. चेन्नई सालेम द्रुतगती महामार्गावरच यादव यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केली आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये ढकलले असे यादव यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

आठ पदरी मार्गाविरोधातल्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांना भेटायला जात असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न असल्याचे कारण सांगून पोलिसांनी आम्हाला पुढे जाण्यापासून अटकाव केला आणि आमच्याकडील फोन काढून घेतले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घरातच भेटणार असल्याचे सांगूनही आम्हाला धक्काबुक्की केली आणि व्हॅनमध्ये ढकलले, असे यादव एक व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.

आपल्याला पोलिसांनी एका विवाह मंडपातून ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांकडे कोणतेही अधिकृत आदेश नव्हते. आपल्याला ताब्यात घेतल्यानंतर सुमारे 5 तासांनी आपल्याला लेखी आदेश दाखवण्यात आले, असे यादव यांनी चेंगमच्या उपविभागीय पोलिस उपअधिक्षकांना लिहीलेल्या सविस्तर पत्रात म्हटले आहे.

चेन्नई ते सालेम दरम्यान 8 पदरी महामार्ग बांधण्यास तेथील शेतकऱ्यांचा विरोध आहे. या प्रकल्पासाठी शेतकरी खरेखर आपली जमीन देण्यास तयार आहेत, की नाहीत याची माहिती यादव यांच्या संस्थेकडून जमा केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)