तामिळनाडूत भाजपा नेत्याच्या घरावर फेकला पेट्रोल बॉम्ब

कोईम्बतूर – तामिळनाडूमधील कोईम्बतूरमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी भाजपा जिल्हाध्यक्षाच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेल्याची घटना समोर आलीये.सी आर नंदकुमार असं या भाजप जिल्हाध्यक्षांचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र, नंदकुमार यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या कारचं नुकसान झालं आहे. पहाटे तीन वाजता नंदकुमार आपल्या घरात झोपले असताना हा बॉम्ब फेकण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं .तामिळनाडूत द्रविडी चळवळीचे जनक रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)