तामिळनाडूत गुटखा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे छापे

आरोग्य मंत्री आणि पोलिस महासंचालकांसह 40 ठिकाणी धाड

नवी दिल्ली – तामिळनाडूमध्ये गुटख्याच्या अवैध साठा प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री आणि पोलिस महासंचालकांसह तब्बल 40 ठिकाणी सीबीआयने छापे घातले आहेत. या प्रकरणी मे महिन्यात सीबीआयने प्रकरण दाखल केले होते.

तामिळनाडूतील 35 ठिकाणी आणि कर्नाटकातील 5 ठिकाणांसह मुंबई आणि पुद्दुचेरीमध्येही सीबीआयने छापे घातले आहेत. यामध्ये तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सी. विजयभास्कर, पोलिस महासंचालक टी.के. राजेंद्रन आणि चेन्नईचे माजी पोलिस आयुक्‍त एस.जॉर्ज यांच्या घरांवरही छापे घातले गेले आहेत. भारतीय महसूल सेवेच्या एका अधिकाऱ्याच्या घरावरही सीबीआयने छापा घातला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

तामिळनाडूमध्ये 2013 मध्ये तंबाखूजन्य पान मसाल्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. त्यानंतर 8 जुलै 2017 रोजी तामिळनाडूतील हा गुटखा गैरव्यवहाऱ सर्वप्रथम उघड झाला होता. प्राप्तीकर विभागाच्या पथकाने तामिळनाडूतील पान मसाला उत्पादक आणि काही अधिकाऱ्यांशी संबंधित एका गोदामावर छापा घातला होता. या पान मसाला उत्पादकांवर 250 कोटी रुयपांचा कर बुडवल्याचा आरोप होता. गुटखा उत्पादकांकडून ज्या व्यक्‍तींना पैसे दिले जात होते, त्यांची यादी असलेली एक डायरी या छाप्यांदरम्यान मिळाली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात द्रमुक नेत्यांच्या मागणीवरून मद्रास उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

याला तामिळनाडूच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला होता आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यानंतर मे महिन्यात सीबीआयने तामिळनाडू सरकार, केंद्रीय उत्पादन शुल्क व्भाग आणि अन्न सुरक्षा विभागामधील अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात प्रकरण “एफआयआर’दाखल केली होती.

पोलिस महासंचालकांचे कनेक्‍शन…
कोणत्याही राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या घरावर सीबीआयने छापा घालण्याची ही आतापर्यंतची कदाचित पहिलीच वेळ असावी. 1984 च्या तुकडीतील पोलिस अधिकारी असलेले राजेंद्रन यांना 2016 मध्ये तामिळनाडूचे पोलिस महासंचालक केले गेले होते. त्यांच्या पूर्वीचे पोलिस महासंचालक अशोक कुमार यांनी गुटखा गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. म्हणून त्यांना जबरदस्तीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले गेले होते, असे समजते आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)