तामिळनाडूच्या राज्यपालांच्या बदनामी प्रकरणी पत्रकारास अटक

विद्यार्थिनींच्या सेक्‍स रॅकेटशी राजभवनाला जोडण्याचा आरोप

चेन्नई- तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या लेखांच्या मालिका छापल्याबद्दल तमिळी साप्ताहिकाच्या प्रसिद्ध संपादकास अटक करण्यात आली आहे. आर. गोपाल असे या संपादकांचे नाव असून ते “नक्कीरन’ नावाच्या साप्ताहिकाचे संपादक आहेत. गोपाल पुण्याला जाण्यासाठी विमानतळावर आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राजभवनाच्यावतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

-Ads-

तामिळनाडूच्या राजभवनाविषयी गोपाल यांनी आपल्या साप्ताहिकातून एक लेखमाला प्रसिद्ध केली होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून ही लेखमाला प्रसिद्ध करण्यात येत होती. त्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षिकेचा संदर्भ असलेल्या एका सेक्‍स रॅकेटविषयीच्या लेखाचाही समावेश होता. विरुधूनगर जिल्ह्यातील एका खासगी महाविद्यालयातील निर्मला देवी या सहायक प्राध्यापक महिलेने महाविद्यालयीन विद्यार्थिनींना अधिकाऱ्यांना सेवा देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या लेखामध्ये करण्यात आला होता. चांगले गुण आणि पैसे मिळवून देण्याचा प्रलोभनाने या प्राध्यापक महिलेने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. निर्मला देवी यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. निर्मला देवींना आपण ओळखतही नसल्याचे स्पष्टिकरण राज्यपालांच्यावतीने देण्यात आले आहे.

या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यास आपली राजकीय कारकिर्द नष्ट होईल, अशा भीतीपोटी काही राजकीय नेत्यांनी राज्यपालांना सेक्‍स रॅकेटमध्ये गोवण्याचे राजकीय षडयंत्र सुरू असल्याची टीका भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांनी केली आहे. एएमएमकेचे नेते टीटीव्ही दिनकरन यांनीही पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले आहे. तर पीएमके, माकपा, भाकप, मक्कल नीती मैयामचे नेते कमल हासन, एमडीएमकेचे प्रमुख वैको आदींनी गोपाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे.

तामिळनाडूतील कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनने कन्नड अभिनेते राजकुमार यांचे अपहरण केल्यानंतर वीरप्पनशी वाटाघाटी करण्यास गोपाल यांना पाठवण्यात येत असे. तेंव्हा द्रमुक पक्षाकडून गोपाल यांच्यावर टीकाही करण्यात आली होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)