तामिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल यांच्या जिल्हा दौऱ्यांना द्रमुकचा विरोध

अधिकाऱ्यांच्या परस्पर बैठका घेत असल्याचा केला दावा
चेन्नाई – तामिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी तामिळनाडुच्या विविध जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. तेथे अधिकाऱ्यांच्या परस्पर बैठका ते घेत आहेत. यावरून द्रमुक पक्षाने त्यांना जोरदार विरोध केला आहे. त्याविषयी तामिळनाडु विधानसभेत आज या पक्षाचे नेते स्टॅलिन यांनी प्रश्‍न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हा विषय उपस्थित करण्यास सभापतींनी अनुमती नाकारली. राज्यपाल ही घटनात्मक पोस्ट आहे आणि त्या पदावरील व्यक्तीच्या विषयी सभागृहात कोणतीही चर्चा केली जाऊ शकत नाही असे नमूद करीत द्रमुक पक्षाला हा विषय उपस्थित करण्यास अनुमती नाकारली.

दरम्यान राजभवनाने या विषयी खुलासा करताना म्हटले आहे की राज्यात कोठेही जाण्यास राज्यपालांना कोणाची परवानगी घेण्याची गरज नाहीं. त्यांच्या या पहाणी दौऱ्यात बेकायदेशीर असे काहीही नाही. राज्यपाल किंवा राष्ट्रपतींच्या दौऱ्यांना विरोध केल्यास संबंधीत व्यक्तींना सात वर्षाच्या कैदेची शिक्षा होऊ शकते असा इशाराही राजभवनाच्या पत्रकात देण्यात आला आहे. त्यावरूनही स्टॅलिन यांनी राज्यपालांवर टीका केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कैदेची धमकी देऊन राज्यपाल राजकारणात हस्तक्षेप करीत आहेत असा इशाराही त्यांनी दिला आहे. या विषयी विधानसभेत आम्हाला चर्चा नाकारली जात असली तरी आम्हीही त्यांच्या दौऱ्यांच्यावेळी त्यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवून त्यांच्या या दौऱ्यांना विरोध सुरूच ठेऊ असेही द्रमुक पक्षाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)