ताबा देण्यास उशिर झाल्यास अधिक दंड

File pic

फ्लॅटच्या जाहिराती बघून हुरळून जाऊन आपण घराची बुकिंग करतो. कालांतराने जसजसा फ्लॅटचा ताबा मिळण्यास उशीर होतो, तसतसे फ्लॅट आणि विकसकाच्या प्रतिमेचा भ्रमाचा भोपळा फुटतो. नव्या घराची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या ग्राहकांना आता ग्राहक मंचाने दिलासा दिला आहे. घराच्या बांधकामाला अधिक वेळ लावणाऱ्या बिल्डरला आता जादा दंड आकारण्यात येणार आहे.

सर्वसाधारणपणे फ्लॅट खरेदीचे व्यवहार करताना नुकसान भरपाईची देखील तरतूद त्यात असते. अर्थात बिल्डरच्या बाजूने अधिक तरतुदींचा समावेश असतो. अनेक विकासक नियोजित वेळेत गृृहप्रकल्प तयार करत नाही. दोन वर्षाचे काम सांगून तीन-चार वर्ष लावतात. यामुळे ग्राहकांना हकनाक भुर्दंड बसतो. बॅंकेचे कर्ज आणि घरभाडे यात ग्राहक आर्थिक अडचणीत सापडतो. बहुतेकदा घर खरेदीच्या वेळी केलल्या करारानुसार बिल्डरने कामाला विलंब लावल्यास त्यास पाच रुपये प्रति चौरस फूट दराने दंड भरावा लागतो. जर कालावधी खूपच कमी राहिला तर दंड देखील माफ होऊ शकतो. मात्र वर्षानुवर्षे काम रखडले असेल तर अशावेळी खरेदीदार कोंडीत सापडतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रीय ग्राहक मंचाने ही समस्या पाहता एखाद्या ग्राहकाला फ्लॅट देण्यास वाजवीपेक्षा अधिक विलंब झाल्यास बिल्डर केवळ पाच रुपयाचा दंड भरून पळ काढू शकणार नाही, असे बजावले आहे. अशा स्थितीत ग्राहक दंडाची रक्कम वाढवून घेऊ शकतात. जर ग्राहकाला पैसे परत हवे असेल तर बिल्डरला दंडासहित ती रक्कम परत करावी लागणार आहे. दिल्लीत एका ग्राहकाला फ्लॅटचा ताबा देण्यास तीन वर्षापेक्षा अधिक कालावधी लागल्याने ग्राहक मंचाने एम्मार एमजीएफला पाच लाख रुपयांचा दंडासह घराची संपूर्ण रक्कम परत करण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर घराचा ताबा देण्यासाठी चालढकल किंवा कोणतीही सबब सांगता येणार नाही, अशीही तंबी दिली. मात्र नेहमीच कोणते ना कोणते कारण सांगून बांधकाम रेंगाळत ठेवणे चुकीचे असल्याचे मत, ग्राहक मंचाने नोंदविले आहे.

– अपर्णा देवकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)