‘ताप’ वाढला! पुण्याचा पारा चाळीशीवर जाणार

दशकभरानंतर मुंबईचे तापमान 41 से. अंशांवर

पुणे- राज्यातील तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तापमानाचा पारा 38 सेल्सियस अंशांवर गेल्याने मुंबईसह, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तापला आहे. सांताक्रुझ येथे उच्चांकी 41.0 सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असल्याने बुधवारपर्यंत (दि.28) तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील दिवस आणि रात्रीच्या तापमानाचा पारा पुन्हा सरासरीच्यावर सरकला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तापमानासह उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तर मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मुंबईत तर राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. रविवारी मुंबईत तब्बल 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मार्चमध्ये मुंबईमध्ये ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर तापमानाची नोंद झाल्याची गेल्या कित्येक वर्षातील घटना असल्याचे ही बोलले जाते.

रात्रीचे तापमान सरासरीच्या खालीच असल्याने दिवस-रात्रीच्या तापमानातील तफावत कायम आहे. रविवारी पश्‍चिम बंगालपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत होते. पश्‍चिम महाराष्ट्रात ही अनेक ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा अधिक आहे. ही स्थिती गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली आहे. त्यापूर्वी रात्री गारठा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती होती. आता, मात्र रात्रीसुद्धा उकाडा जाणवत आहे. पुणे शहरातसुद्धा आज तापमान 37 अंशांपर्यत पोहचले होते. हे तापमान सरासरीपेक्षा दोन अंशांनी जास्त आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्‍चिम महाराष्ट्रातील शहरामध्येही तापमान एक ते दोन अंशाने वाढलेले आहे.

अकोला-  40.5
ब्रह्मपुरी-  40.1
सोलापूर-  40.2
परभणी-  40.0
जळगाव- 39.2
मुंबई (कुलाबा) : 38.0
पुणे – 37.0
महाबळेश्‍वर- 32.6


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)