तापसी पन्नूला मोठा झटका

‘नाम शबाना’सारख्या हिट नंतर बॉलिवूडमध्ये जम बसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तापसी पन्नूला एक मोठा झटका बसला आहे. शुटिंग या विषयावरच केंद्रीत असलेल्या तिच्या “वुमनिया’ चे शुटिंगच थांबले आहे. एवढेच नव्हे, तर हे शुटिंग नक्की कधी सुरू होणार हे देखील स्पष्ट नाही आहे. “वुमनिया’मध्ये तापसी पन्नूच्या बरोबर कृती सेननही होती. पण अचानक तिने हा सिनेमा सोडला. त्यामागचे कारण निश्‍चित माहिती नाही. त्यामुळे या सिनेमाचे शुटिंग थांबवणे भाग पडले. मात्र दुसऱ्या हिरोईनचा शोध घेण्याऐवजी फॅंटम फिल्म्सने हा प्रोजेक्‍टच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. “वुमनिया’चे शुटिंग एप्रिल महिन्यात सुरू होणार होते. मात्र आता जून महिना संपायला आला तरी यासंदर्भात कोणतीही हालचाल होताना दिसलेली नाही. केवळ प्रोडक्‍शनचे काम सांभाळण्यासाठी डायरेक्‍टरच्या हातात प्रोजेक्‍ट सोपवला गेला. याव्यतिरिक्‍त काहीही घडलेले नाही. “वुमनिया’ हा सिनेमा वुमन शुटर्सशी संबंधित आणि सत्यकहाणीवर आधारित आहे. वेगळी आणि सत्यकथा असल्यामुळे याबाबत जरा जास्त उत्सुकता निर्माण झाली होती. तापसीलही “नाम शबाना’सारखा रोल पुन्हा करायला मिळणार म्हणून आनंद होता. मात्र आता सगळेच बोंबलले आहे.

तापसीची बहिण शगुन पन्नू ही देखील आता लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. मात्र ती नक्की कोणत्या प्रोजेक्‍टमधून पदार्पण करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान तिने इन्स्टाग्रामवर आपले स्वतःचे फोटो शेअर करून लोकांमध्ये चर्चेला सुरुवात करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी ती रोममध्ये सुट्टी एन्जॉय करत होती. ती व्यवसायाने वेडिंग प्लॅनर आहे आणि मॉडेलिंगमध्येही ऍक्‍टिव्ह आहे. तापसीसाठी आपली ही धाकटी बहिण म्हणजे अगदी जीव की प्राण आहे. तापसीने 4-5 बॉलिवूडपट केले असले तरी फॅशनच्या बाबतीत तापसीपेक्षा शगुन चार पावले पुढेच आहे. तिचा ड्रेसिंग सेन्स आणि कलर सेन्स जबरदस्त आहे. शगुनला नव्या फॅशन ट्रेंडसची चाम्गली जाण आहे. हे या दोघींच्या फोटोंवरून लक्षात येते आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)