तापसीने सोडला अनुराग बासूचा ‘मेट्रो’चा सिक्‍वेल

दिग्दर्शक अनुराग बासू आपला सुपरहिट चित्रपट लाइफ इन मेट्रोचा सिक्वल बनवणार असून, त्यामध्ये तापसी पन्नूला कास्ट करण्यात येणार असल्याची चर्चा होती, परंतु सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तापसीने हा चित्रपट सोडला आहे. या चित्रपटात राजकुमार राव, फातिमा सना शेख, आदित्य रॉय-कपूर व अभिषेक बच्चनला कास्ट करणार आहेत अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे.

याशिवाय या चित्रपटात आदित्यच्या अपोझिट तापसी पन्नूला कास्ट करण्यात येणार असल्याचेही म्हटले जात होते, परंतु आता सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तापसी या चित्रपटाचा हिस्सा नसेल. तापसीने या चित्रपटाच्या शूटिंगकरिता अनुराग यांच्याकडे तारखांचा तपशील मागितला होता, परंतु अनुराग बासू याविषयी निश्‍चित काही सांगू शकले नाहीत. त्यामुळे त्यानंतर तापसीने स्वत:ला या चित्रपटापासून वेगळे केले. तापसीने यापूर्वीच आपला आगामी चित्रपट वूमनियाचे शूटिंग सुरू केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तापसीने नेहमीच ग्लॅमरस रोलपेक्षा आपल्या कॅरेक्‍टरला सिनेमामध्ये किती महत्वाचे स्थान आहे, या निकषाच्या आधारे सिनेमाची निवड केली आहे. तिने केलेल्या “मुल्क’, “नाम शबाना’ आणि “मनमर्जियां’सारख्या सिनेमांवर नजर टाकली तर हे लगेच पटेल. त्याशिवा “सूरमा’ आणि “गाझी अटॅक’सारख्या सिनेमांमध्ये तिला मध्यवर्ती रोल नव्हता. पण एकूण स्टोरीमध्ये तिच्या रोलचे महत्व विशेष होते. आपल्या रोलला सिनेमात कमी महत्व असणार असेल तर त्यात तिला विशेषस्‌ इंटरेस्ट नसतो. कदाचित म्हणूनच “मेट्रो’च्या सिक्‍वेलबाबत तिने विशेष विचार केला नसावा.

आता तर तिने बिजनेसकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. बॅडमिंटन प्रिमिअर लीगसाठी तिने पुण्याची टीम विकत घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या चौथ्या सीझनमध्ये तिच्या टीमला “चीअर अप’ करण्यात तिला विशेष आनंद आहे. स्वतः बॅडमिंटन खेळाडू होऊ न शकल्याचा आनंद ती आपल्या टीमच्या खेळातून शोधू पहाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)