तापमान वाढल्याने फिनिक्‍समधील 40 हून जास्त फ्लाइट्‌स रद्द

फिनिक्‍स (अमेरिका), दि. 20-फिनिक्‍स ऍरिझोना येथील तापमान प्रचंड्‌ प्रमाणावर वाढल्याने 40 पेक्षाही अधिक उड्डाणे रद्द करावी लागल्याची माहिती देण्यात आलेली आहे. यातील बहुतेक उड्डाणे दु. 3.00 ते 5.00 या काळातील होती. फिनिक्‍स शहराचे तापमान 118 डिग्री फॅरनहीट (48 अंश फॅरनहीट) इतके वाढले होते. अनेक विमानांसाठी इतक्‍या उच्च तापमानाला हवेत झेप घेणे शक्‍य होत नाही असे सांगण्यात आले आहे. उदा. इतक्‍या उच्च तपमानात बॉम्बॅर्डियर सीएआरजे एयर लाईनर्सना उड्डाण करणे ही कठीण गोष्ट होऊन बसते. त्यांच्या उड्डाणांसाठी 118 (फॅरनहीट)अंश फॅ. ही तापमानाची सर्वोच्च मर्यादा आहे. उच्च तापमानात हवेची घनता कमी होते. खालील बाजूने मिळणारा लिफ्ट कमी होतो. परिणामी हवेत झेप घेण्यासाठी विमानाच्या इंजिनीला अधिक थ्रस्ट निर्माण करावा लागतो. अमेरिकन एयर लाइन्सनेही स्काय हार्बर विमानतळावरून होणारी डझनभर उड्डाणे रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
रद्द केलेल्या विमानोड्डाणांत स्थानिक उड्डाणांची संख्या अधिक आहे. बोइंग 747 किंवा एयर बससाठी “ऑपरेटिंग टेम्परेचर’ काहीसे अधिक असल्याने फिनिक्‍समधील वाढत्या तापमानाचा त्यांच्या उड्डाणांवर फारसा परिणाम होत नाही. ही विमाने 125-27 फॅरेनहीट (53 अंश सेंटिग्रेड) उड्डाण करण्यास सक्षम असतात असे अमेरिकन एयरलाएन्सने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)