तापमान वाढणार, पाऊसही पडणार

हवामान खात्याचा अंदाज


पुण्यात ढगाळ वातावरण

पुणे- पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात मंगळवारपर्यंत (दि. 17) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान रविवारीही मराठवाड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.

राज्यातील उन्हाचा चटका वाढला असून, रविवारी (दि.15) सकाळपर्यंत मालेगाव येथे उच्चांकी 42.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारनंतर राज्याच्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्‍यता आहे.

दक्षिण कर्नाटक ते केरळपर्यंत वाऱ्यांच्या प्रवाह खंडित झालेले आहे. तर नैऋत्य मध्यप्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने राज्यात पाऊस पडण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. रविवारी दुपार नंतर मराठवाड्यातील तुळजापूर, यवतमाळ या भागात जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी तर वादळी पाऊस झाला. पुण्यातही दुपारनंतर काही काळ ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले.

मंगळवारपर्यंत (दि.17 ) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. दरम्यान, राज्यात गेले दोन दिवस मुख्यत: कोरडे हवामान असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात कमाल तापमान 37 अंश ते 41 अंशांच्या आसपास, तर कोकणात 31 ते 33 अंशांच्या जवळपास आहे.

प्रमुख शहरातील तापमान
नाशिक,37.6, नागपूर, 39.7, औरंगाबाद, 39.0 नांदेड 40.0,सांगली38.4,सातारा 38.6,परभणी 41.7

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)