तापमान बदलाच्या चर्चेला अमेरिकेचा खोडा

गरीब देशांना आर्थिक मदत देण्यात अडथळे
बॅंकॉक – जागतिक तापमान बदलाच्या करारातून अमेरिका बाहेर पडली आहे तरीही तो देश या विषयीच्या जागतिक पातळीवरील चर्चेला खोडा घालून त्यात अडथळे आणित असल्याचा आरोप संयुक्तराष्ट्रांतील सूत्रांनी केला आहे. जागतिक तापमान वाढीच्या समस्येने जगातील ज्या गरीब देशांना नुकसान सोसावे लागत आहे त्या देशांना आर्थिक मदत करण्याच्या संबंधात संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने होणाऱ्या चर्चेत अमेरिकेकडून अडथळे आणले जात आहेत अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे.

विकसनशील देशांना या संबंधात निधी पुरवण्याच्या विषयावरून गेल्या मंगळवार पासून चर्चा सुरू आहे. जागतिक तापमान वाढीमुळे पूर, उष्ण वारे, समुद्राचीवाढती पातळी इत्यादी समस्यांचा सामना करणाऱ्या देशांना पॅरीस करारात सन 2020 पासून दरवर्षी शंभर अब्ज डॉलर्सची मदत देण्याची तरतूद आहे. पण हा निधी कसा उभारायचा आणि तो पैसा कोणी पुरवायचा हे महत्वाचे प्रश्‍न उभे राहिले आहेत.

अमेरिका पॅरीस करारातून बाहेर पडल्याने त्यांच्याकडून हे पैसे मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. आता अन्य विकसित देशांकडून हा निधी मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असताना अमेरिका त्यातही अडचणी आणत आहे असे या सूत्रांचे म्हणणे आहे. विकसित देशांनी उत्सर्जित केलेल्या कार्बनमुळेच ही जागतिक तापमान वाढीची समस्या उद्‌भवली आहे त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनीच पैसे पुरवले पाहिजेत हे तत्व पॅरीस करारात मान्य झाले आहे असे या सूत्रांनी निदर्शनाला आणून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)