तापमानाचा पारा ओलांडणार चाळीशी?

पिंपरी – शुक्रवारी उन्हाचे चटके सोसल्यानंतर शनिवारी पुन्हा नागरिकांना उकाडा सहन करावा लागणार आहे. शनिवारी पारा उसळी घेऊन चाळीसचा आकडा ओलांडण्याची शक्‍यता आहे. शनिवारी कमाल तापमान चाळीस अंश सेल्सियसपर्यंत पोहचण्याची शक्‍यता पुणे वेधशाळा आणि खासगी हवामान संस्था “स्कायमेट’ने वर्तवली आहे.

“स्कायमेट’ने वर्तविलेल्या अंदाजानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये ढगही जमा होऊ शकतात, असे झाल्यास उकाडा आणखी तीव्रतेने जाणवेल. पुणे वेधशाळेने नोंदवलेल्या आकड्यांनुसार शुक्रवारी पारा 40.2 अंश सेल्सियसपर्यंत पोहचला होता, तर किमान तापमान 17.6 अंश सेल्सियस इतके होते. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाचे तीव्र चटके जाणवत होते.

दुपार होईपर्यंत अंगाची लाही-लाही करणारा उकाडा जाणवत होता. असेच काहीसे वातावरण किंबहुना त्याहून अधिक उकाडा शनिवारी सहन करावा लागणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. रविवारपासून तापमान कमी होण्याची शक्‍यता आहे. मे महिन्याची सुरुवात मात्र पुन्हा प्रचंड उकाड्याने होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)