“तानाजी’मध्ये सैफ बनणार शिवाजी महाराज 

सैफ अली खानने दोन हिरो असलेल्या सिनेमात काम करणे थांबवले आहे. मात्र सध्या त्याच्या करिअरचा बॅड पॅच सुरू आहे. त्यामुळे अजय देवगण प्रॉडक्‍शनच्या “तानाजी’मध्ये काम करण्यास त्याच्याकडून होकार दिला जाण्याची शक्‍यता आहे.
आपल्या होम प्रॉडक्‍शनच्या या सिनेमामध्ये अजय देवगण नरवीर तानाजीचा लीड रोल साकारणार आहे. या ऐतिहासिक विषयावरील सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करण्याचा प्रस्ताव अजयने सैफला दिला आहे, असे समजते आहे. या प्रस्तावावर सैफ फारच गांभीर्याने विचार करतो आहे. हा प्रस्ताव त्याच्याकडून नाकारला जाण्याची शक्‍यता फारच कमी आहे. “तानाजी’मध्ये शिवाजी महाराजांच्या पत्नीचा रोल काजोल साकारण्याचीही शक्‍यता आहे.
सहा महिन्यांपूर्वी घोषणा झालेल्या “तानाजी’चे शुटिंग अलिकडेच सुरू झाले आहे. शिवाजी महाराजांवर मराठी आणि हिंदीमध्ये एकाचवेळी सिनेमा करण्याची रितेश देशमुखची योजना होती. त्याचे डायरेक्‍शन रवि जाधव करणार असे समजले होते. मात्र ती योजना सध्या बासनात गुंडाळली गेली आहे, असे वाटते. या सिनेमाच्या स्क्रीप्टचे काम पूर्ण झाले आहे, मात्र बजेटच्या मुद्दयावरून सिनेमाच्या प्रॉडक्‍शनला गती मिळालेली नाही.
What is your reaction?
6 :thumbsup:
7 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)