“तानाजी’मध्ये जगपति बाबूची एन्ट्री

अजय देवगन याच्या आगामी “तानाजी’ चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. यात अजय देवगन सोबत सैफ अली खानही काम करणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता यात तेलुगु सुपरस्टार जगपति बाबू याचे नाव निश्‍चित झाले आहे. मुंबईतील स्टुडिओमध्ये जगपति बाबूला कॉस्टयूमसह स्पॉट करण्यात आले आहे. पण ते कोणाची भूमिका साकारणार आहेत हे समजू शकले नाही.

“तानाजी’ चित्रपटातील कलाकारांची स्क्रीनटेस्ट आणि फोटोशूट्‌सचा सिलसिला सुरू असून ऑक्‍टोबरमध्ये चित्रिकरणही सुरू करण्यात येणार आहे. ओम राउत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिका साकारत आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री काजोलही झळकण्याची शक्‍यता आहे.

अजय देवगण याचा “तानाजी’ हा ड्रिम प्रोजेक्‍ट असून यासाठी तब्बल 150 कोटी रुपयांचे बजट निश्‍चित करण्यात आले आहे. यात चित्रपटाच्या व्हीएफएक्‍ससाठी मोठा खर्च करण्यात येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण याची व्हीएफएक्‍स कंपनी करत आहे.

दरम्यान, अजय देवगणच्या चाहते या चित्रपटाबाबत खूपच उत्सुक आहेत. कारण अजय देवगण प्रथमच अशा भूमिकेत काम करणार आहे. तसेच सैफ अली खान हा व्हिलनची भूमिका साकारू शकतो. यापूर्वी अजय देवगण आणि सैफ अली खान यांची जोडी विशाल भारद्वाज याच्या “ओंकारा’ चित्रपटात झळकली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)