पिंपरी – दुकानाचे शटर उचकटून दुकानात ठेवलेले 64 हजार रुपये किंमतीचे ड्रेस मटेरियल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना पवार मार्केट, ताथवडे येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.
अनिल नारायण वाडेकर (वय-45, रा. इशा जिनीस सोसायटी, ताथवडे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल यांचे ताथवडेमधील पवार मार्केट येथे मुद्रा ट्रेलर अँड रेडिमेडस हे दुकान आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास अनिल यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 64 हजार रुपयांचे ड्रेस मटेरियल चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा