तातपुरत्या जाहिरातींचे दर राजकीय पक्षच ठरविणार

-145 चौकांतील जागा निश्‍चितीवर पक्षनेत्यांचे एकमत : खास सभेत घेणार निर्णय

पुणे – राजकीय नेते तसेच शहरातील नागरिकांना आपल्या जाहिराती करण्यासाठी महापालिकेकडून शहरातील 145 चौकांतील जागा निश्‍चित करून देण्यात येणार आहेत. येथील जाहिरातींचे दर प्रत्येक राजकीय पक्षाने सूचविण्याचा निर्णय महापालिका पक्षनेत्यांच्या सभेत गुरूवारी घेण्यात आला.

महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने 2016 मध्ये पक्षनेत्यांच्या बैठकीत ठेवला होता. या जागा निश्‍चित झाल्यास शहरातील अनधिकृत जाहिरातींना आळा बसण्यास मदत होणार आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्याबाबत काहीच निर्णय घेतला जात नव्हता. मागील महिन्यात शहरातील अनधिकृत जाहीरातींना आळा घालण्यासाठी अशा जाहिरातदारांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने वारंवार महापालिकेस दिले आहेत. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने भाजपच्या दोन नगरसेवकांवर थेट गुन्हेच दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने नगरसेवकांची तारांबळ झाली आहे.

ही बाब लक्षात घेऊन, महापालिकेने राजकीय प्रतिनिधी तसेच शहरातील नागरिकांना आपल्या जाहिराती करायच्या असल्यास काही प्रमुख ठिकाणी जागा निश्‍चित करून द्यावी, त्यामुळे पालिकेस उत्पन्नही मिळेल आणि जागा मिळल्याने शहरात सर्वत्र अनधिकृत जाहीरातीही होणार नाहीत, अशा पद्धतीने काही उपाययोजना करता येतील का, अशा पद्धतीचे निर्देशही दिले होते. त्यामुळे पालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने शहरातील प्रमुख 145 चौकांमध्ये काही ठराविक आकारात जाहिरातींसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच त्यासाठी शुल्क नियमाप्रमाणे आकारल्यास अशा जाहिरातदारांना हक्काची जागा मिळेल.

तसेच पालिकेसही उत्पन्न मिळेल आणि शहरातील अनधिकृत जाहिराती कमी होऊन लहान मोठे बोर्ड, फलक तसेच फ्लेक्‍समुळे होणारे शहराचे विद्रूपीकरणही थांबेल ही बाब लक्षात घेऊन या बाबतचा प्रस्ताव धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पक्षनेत्यांच्या बैठकीत ठेवला होता. मात्र, त्याचे कोणतेही दर निश्‍चित करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे हे दर तात्पुरते असल्याने ते कमी असावेत, अशी मागणी करण्यात आली. तर प्रशासनाने सर्व सहमतीने हे दर निश्‍चित करावेत अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन हे दर निश्‍चित करावेत आणि 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या पक्षनेत्यांच्या खास सभेत सादर करावेत त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊन ते अंतिम करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)