ताडोबा प्रवेशद्वारावर पंधरा मिनिटे उशीर पोहचल्यास ५०० रुपये दंड !

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर नियोजित वेळेत पोचले नाहीतर,आता ५०० रुपये दंड भरावा लागणार. पर्यटक वेळेपेक्षा १५ ते २० मिनिट उशिरा पोचत असल्याकारणाने हा नवीन नियम करण्यात आला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा मध्ये बहुसंख्य पर्यटक दीड ते दोन तास उशिरा येत असल्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे .येत्या १ जानेवारी पासून हा नवीन नियम लागूही करण्यात आला आहे.

मोहुर्ली, झरी, पांगडी, कोलारा, खुटवंडा व नवेगांव असे, ऐकून सहा प्रवेशद्वारे ताडोबा मध्ये असून, आत जाण्यासाठी सकाळी साडे सहा वाजता प्रवेश दिला जातो तर दुपारी दोन वाजता सफारीला सुरूवात होते.  हिवाळय़ात नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. या सहाही प्रवेशद्वारांवर सकाळच्या सत्रात सफारीसाठी पावणेसात पर्यंत पोहचणे अनिवार्य आहे. एखादा पर्यटक उशिरा पोहचला तर आता त्याला ५०० रूपये दंड ठोठावण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात सुद्धा हा नियम अशाच पद्धतीने लागू असणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)