राधामोहन सिंह यांच्या हस्ते उपकरणाचे अनावरण
नवी दिल्ली – ताज्या मासळीमधील भेसळ ओळखणाऱ्या रॅपीड डिटेक्शन किट्स या उपकरणाचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांनी आज नवी दिल्लीत अनावरण केले. कोची इथल्या केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान मत्स्योद्योग क्षेत्रात अनेकदा बर्फ वितळू नये यासाठी अमोनियाचा तर मासळी जास्त काळ टिकावी यासाठी फॉमेल्डड्राईड यासारख्या रसायनांचा वापर केला जातो.
या उपकरणाद्वारे मासळीमधल्या या दोन्ही रसायनांचा छडा लावता येतो. या दोन्ही रसायनांचे सातत्याने सेवन झाल्यास पोटदुखी, उलटी, बेशुद्ध होणे यासारख्या आरोग्यविषयक समस्यांबरोबरच कधी कधी मृत्यू ओढावतो असे राधामोहन सिंह यांनी या उपकरणाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0