ताजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामचंद्र पिंपळे

कार्ला,  (वार्ताहर) – ताजे पिंपळोली पाथरगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी पिंपळोली येथील रामचंद्र पिंपळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. ताजे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच रामदास केदारी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कार्ला परिमंडल हेमंत भोकरे व सहायक गायकवाड, ग्रामसेवक नरेंद्र नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक घेण्यात आली.

पिंपळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. माजी सरपंच रामदास केदारी, उप सरपंच सुरेश केदारी, ग्रामपंचायत सदस्य सागर मोरे, रेश्‍मा संदीप बोंबले, सुनंदा केदारी, कुंदा बालगुडे, नंदा चौरे, आरती सोमवंशी यांनी पिंपळे यांचा सत्कार केला.
ज्येष्ठ उपाध्यक्ष बाबूराव केदारी, विष्णू बोंबले, दिंडी समाज अध्यक्ष नरहरी केदारी, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस दीपक हुलावळे, खरेदी-विक्री संघ सभापती बाळासाहेब भानुसघरे, अमोल केदारी, सज्जन बोंबले, भरत येवले, प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष सुभाष भानुसघरे, नंदकुमार हुलावळे, बाळासाहेब केदारी, सोपान पिंपळे, राष्ट्रवादी सरचिटणीस प्रकाश भानुसघरे, बापू पिंपळे, संदीप चौरे, संदीप बोंबले, गणेश केदारी, नवनाथ असवले, मारुती येवले, तानाजी पडवळ, अंतू बोंबले, शंकर बोंबले यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)