ताजमहाल देवाची संपत्ती – वक्फ बोर्ड

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ताजमहाल ही देवाची संपत्ती आहे असे उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डानी म्हटले आहे. ताजमहाल देवाची संपत्ती आहे, पण व्यवहारिक वापरासाठी ही वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याची नोंद करण्यात यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने वक्फ बोर्डाला सुनावत ताजमहाल तुमची संपत्ती आहे हे सिद्ध करणारे शाहजहाने स्वत: स्वाक्षरी केलेली कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला होता. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. कागदपत्रे सादर करण्यासाठी वक्फ बोर्डला एका आठवड्याचा अवधी देण्यात आला होता.

त्याप्रमाणे मंगळवारी झालेल्या सुनावणीत वक्फ बोर्डाने ताजमहाल देवाची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. सोबतच आपल्याकडे शाहजहाने स्वाक्षरी केलेली कोणतीही कागदपत्रे नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कोणतीही व्यक्ती ताजमहालवर मालकी हक्क सांगू शकत नाही असेही वक्फ बोर्डाने सांगितले आहे. कोणत्याही मालकीविना आम्ही ताजमहालची देखरेख करु शकतो असेही ते बोलले आहेत. बोर्डाने पुरातत्व विभागाकडे फक्त देखरेख करण्यासाठी ताजमहाल आमची संपत्ती म्हणून नोंद करावी अशी विनंतीही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)