ताजमहालाच्या रक्षणाबाबत बेफिकीरी…

सर्वोच्च न्यायालयाने सरकारी अनास्थेबद्दल ओढले ताशेरे
नवी दिल्ली – ताजमहाल या जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तुच्या देखभाल आणि संरक्षणाबाबत सरकारी पातळीवरून अत्यंत अनास्था दाखवली जात आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्‍त केला आहे. ताजमहालाची सध्याची स्थिती अत्यंत होपलेस झाली आहे अशी टिपण्णी न्यायालयाने केली आहे. या वास्तुचे रक्षण व जतन करण्यासंबंधात एक व्हीजन डॉक्‍युमेंट सादर करण्याची सुचना सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश सरकारला केली होती पण ती त्यांनी दुर्लक्षित केली त्याबद्दल न्यायालयाने त्या सरकारवर ताशेरे मारले आहेत.

या वास्तुचे जतन करण्याच्या संबंधातील विस्तृत योजना सादर करण्याची सुचना न्यायालयाने केंद्र सरकारला केली आहे. संसदेच्या स्थायी समितीनेही ताजमहालाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले. केंद्र सरकारी पातळीवरून तरी त्याविषयी काही ठोस उपाययोजना केली जाणे अपेक्षित होते.

ताजमहालाच्या परिसरातील वायुप्रदुषणाच्या पातळीत वाढ झाल्याने या वास्तुचे नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. पण या विषयाचा सविस्तर अभ्यास आयआयटी कानपुर कडून केला जात असून त्या विषयीचा अहवाल येत्या चार महिन्यात सरकारला प्राप्त होईल अशी माहिती केंद्र सरकारकडून यावेळी देण्यात आली. 31 जुलै पासून या प्रकरणात आम्ही दैनंदिन स्वरूपात सुनावणी घेणार आहोत असे कोर्टाने यावेळी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)