ताग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

चिंबळी- शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ताग लागवड करण्यास सुरुवात केली असून, या पिकापासून शेतात खत निर्मिती आणि तण विरहित शेतीचा प्रयोग केला जात आहे. ताग लागवड करणे आणि पीक हातात आल्यावर त्यावर रोटर किंवा नांगरणी करून ते पीक जमिनीत गाडले गेल्यास त्यातून पेरणीयुक्त पोषक जमीन तयार करणे हा प्रयोग सध्या शेतकरी करूत आहेत. या प्रयोगामुळे पीक उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. या शेतात ऊस लागवड बहुतांश ठिकाणी होताना दिसून येत आहे. पावसाने दडी मारल्याने पेरलेली सर्वच पिके जळून जाण्याच्या मार्गावर असून पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाऊस लांबल्याने शेत कोरडी पडली असून, पावसाच्या भरवशावर बसण्यापेक्षा शेतकरी ताग पेरून शेत मशागतीसाठी सोडून देत आहेत. एकदा चांगला पाऊस पडल्यावरच शेतात पीक लागवड करणार असल्याचे काहींची म्हणणे आहे. यामुळे ताग लागवडीकडे शेतकरी अधिक लक्ष देत आहेत.परिसरातील शेतकऱ्यांना याबाबत अधिकचे मार्गदर्शन लाभल्यास निश्‍चितच उत्पादन मागणीनुसार होऊ शकते, असे मत येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)