ताकटेंनी पाणी वाटपात कधीही राजकारण केले नाही

गोपाळपूर – आबासाहेब ताकटे यांनी सर्वांना पाटपाणी कसे मिळेल याकडेच लक्ष दिले. त्यांनी कधी दुजाभाव केला नाही. पाण्याचे राजकारण न करता कठीण परिस्थितीतही मध्यस्थाची भूमिका बजावली. अतिशय मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध होते. त्यांनी यापुढेही सामाजिक कार्यात सक्रिय रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केले.

नेवासा तालुक्‍यातील शिरसगाव येथील पाटबंधारे विभागामध्ये गेल्या 37 वर्षापासून कार्यरत असलेले गोपाळपूरचे आबासाहेब ताकटे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लंघे बोलत होते. प्रजासत्ताकदिनी त्यांचा निरोप समारंभ शिरसगाव येथे पार पडला. यावेळी परिसरातील विविध पाणी वापर संस्था, पाटबंधारे विभागाच्या वतीने आबासाहेब ताकटे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

-Ads-

ताकटे म्हणाले की, परिसरातील लोकांनी मला समजून घेतले. माझ्या कार्यकाळात प्रमाणिकपणे कामे केली. त्या कामाचाच हा गौरव आहे. भविष्यातही सामाजिक कामासाठीच वेळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शाखा अधिकारी एच. बी. पवार, डी. एन. शिवगण, पुरूषोत्तम सर्जे, बबनराव देशमुख यांनी भाषणातून ताकटे यांच्या कार्याचा गौरव केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)