तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड

सातारा-विद्युत मंडळाच्या डीपीतील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत 4 लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.विजय बाळकृष्ण पवार ,गणेश अंकुश पवार,अमर अशोक पवार ( सर्व रा.आरफळ), ऋषीकेश भानुदास घाडगे (रा.घडगेवाडी,ता फलटण),
सचिन प्रकाश चव्हाण, मंगेश बाळासो चव्हाण ( दोघे रा.मानेवाडी, ता.सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून डीपीमधील तांब्याच्या तारा चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. सतत होणारी चोरी अन त्यामुळे होणार त्रास यामुळे शेतकरी वर्ग संतापला होता. त्यामुळे पोलिस चोरट्यांच्या मागावर होते. कारवाईच्या योग्य त्या सुचना जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरूवारी रात्रगस्त घालत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी एलसीबीच्या पथकाला काहीजण करंजेनाका येथे चोरी केलेल्या तांब्याच्या तारा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार एलसीबीच्या पथकाने सापळा रचून कार व दुचाकीस्वंराना पकडून कारमधील चौघांकडे व दुचाकीवरील दोघांकडे चौकशी केली. त्या कारची पाहणी केली असता त्यामध्ये तांब्याच्या तारा आढळून आल्या.

चौकशी केल्यानंतर संशयितांनी तांब्याच्या तारा बिचुकले, अनपटवाडी व आनेवाडी टोलनाका परिसरातून चोरल्याची कबुली दिली. यावेळी तांब्याच्या तारा,कार,दुचाकी,मोबाईल असा एकुण 4 लाख 25 हजाराचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला. या कारवाईत पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक पद्माकर घनवट, फौजदार सागर गवसणे,सहा.फौजदार विलास नागे,पो.हवा.दीपक मोरे,मोहन नाचण,योगेश पोळ,राजकुमार ननावरे,संतोष जाधव,प्रवीण कडव,वैभव सावंत,गणेश कचरे,मारूती अडागळे यांनी सहभाग घेतला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)