तांब्याची तार चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सक्तमजुरी

पुणे- विजेचा ट्रान्सफॉरर्मर खोलून त्यातील तांब्याची तार चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अडीच वर्ष सक्तमजुरी आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरीक्त सत्र न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी हा आदेश दिला आहे.
दत्तात्रय विठ्ठल साबळे (वय 35, रा. बहुळ, खेड) असे शिक्षा झालेल्यांचे नाव आहे. या प्रकरणात शिक्रापूर येथील एमएसईबीचे तत्कालीन कनिष्ठ अभियंता अजय मालपे यांनी फिर्याद दिली होती. ही घटना 17 जानेवारी 2005 रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली. साबळे हा साथीदारासह शिक्रापूरजवळील आपटी गावातील ट्रान्सफॉर्मर खोलून त्यातील ऑईल फेकून देवून तांब्याची तार चोरण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याचवेळी पोलीस पाटील आणि गावकरी गस्त घातल असताना त्यांना ट्रान्सफॉर्मरजवळ उजेड दिसला. त्यामुळे ते सर्व उजेडाच्या दिशेने निघाले. गावकरी येत असल्याचे समजताच दोघांनी त्यांच्याजवळील हत्यारे, तांब्याच्या तारेचे वेटोळे आणि दोन दुचाकी तेथेच सोडून पळ काढला. याबाबत गावकऱ्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. दरम्यान, पळून जात असताना साबळे याचे ड्रायव्हींग लायसन घटनास्थळीच पडले होते. त्यानुसार त्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे कामकाज अतिरीक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी पाहीले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार सुनील मोरे यांनी मदत केली. या घटनेतील दुसऱ्या गाडीचा मालक मनोज मेवालाल हा फरार आहे. त्याचा विरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने शिक्रापूर पोलिसांना दिले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)