तांबेवाडीच्या सरपंचपदी तान्हाजी कुंजीर

आळेफाटा-तांबेवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी तान्हाजी सीताराम कुंजीर हे जनतेतून बहुमताने निवडून येऊन विजयी झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किसन खोडदे यांनी दिली. या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच पडला. या निवडणुकीमधे विजयी झालेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे तान्हाजी सीताराम कुंजीर 233 सरपंचपदी विजयी झाले, तर सदस्यपदी सुजाता दत्तात्रय तांबे व सचिन बबन तांबे हे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले तर नागरिकांचा मागास प्रवर्गातील स्ञी उमेदवाराची एक जागा रिक्त राहिल्याने उर्वरित चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये रोहिदास रभाजी तांबे 59, रूपाली युवराज बांगर 71, गणेश बबन कुंजीर 116 तर कविता सागर कुंजीर यांना 108 मते हे उमेदवार सदस्यपदी विजयी झाले. या निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)