तांबवेत फुटबॉल स्पर्धांना दिमाखात प्रारंभ

कराड, दि. 10 (प्रतिनिधी) -कोयनाकाठ चॅरीटेबल ट्रस्ट संचलित येथील फुटबॉल टीमच्यावतीने तांबवे (ता. कराड) येथील आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धांना शनिवारी प्रारंभ झाला. स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापुर, पूणे जिल्ह्यातील 22 संघ सहभागी झाले आहेत.
गावातील तरुणांनी एकत्र येवून कोयनाकाठ ट्रस्टअंतर्गत फुटबॉलची टीम सुरु केली. त्याअंतर्गत फुटबॉल खेळाची ग्रामीण भागातील तरुणांनाही गोडी लागावी या हेतूने पहिल्यांदाच सेव्हन साईड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे. यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष निवासराव पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
यावेळी उपसरपंच धनंजय ताटे, सतीश पाटील, लालासाहेब पवार, नंदकुमार साठे, दिपक पवार, जाधव, संजय पाटील, पंच सतीश घारे, राजु सणगर, अकील शेख, अक्षय मोहिते यांच्यासह खेळाडु व प्रेक्षक उपस्थित होते. स्पर्धेसाठी सातारा, सांगली, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातील 22 संघ सहभागी झाले आहेत. पहिल्यांच भरवण्यात आलेल्या सामन्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उद्या (रविवारी) स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या संघांना 7 हजार 777, 5 हजार 555 आणि 3 हजार 333 रुपयांचे बक्षीस, शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचबरोबर उत्कृष्ठ गोलकिपरला 500 रुपये आणि उत्कृष्ठ फुटबॉल खेळाडुन 500 रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. राष्ट्रीय खेळाडु अतुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. राहुल साठे यांनी सुत्रसंचालन केले. अनिल बाबर यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)