मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्‍वरी

मानाचा दुसरा गणपती : तांबडी जोगेश्‍वरी

यंदाचे मंडळाचे वर्ष १२६ वे 


मिरवणुकीस प्रारंभ सकाळी १० वाजता


श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता 

लोकमान्य टिळकांनी चालू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा 126 वे वर्ष साजरे करीत आहे. पुण्यनगरीत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांनी ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्‍वरीच्या गणपतीस मानाचा क्रमांक दोन दिला हे सर्वश्रुत आहे. पुण्यातील कसबा गणपती हे ग्रामदैवत व श्री तांबडी जोगेश्‍वरी ही ग्रामदैवता म्हणून प्रसिध्द आहेत. 1893 पासून तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव पारंपारिक पध्दतीने तसेच शिस्तबध्द स्वरुपात साजरा केला जातो. श्रीं ची उत्सवमुर्ती दरवर्षी शाडू मातीची नवीन बनवून प्राणप्रतिष्ठा करुन अनंत चतुर्दशिला मुठा नदीच्या पात्रात विसर्जित करण्यात येते. ही मूर्ती सध्याचे मूर्तीकार श्री. द. म. गुळूंजकर याच्या घराण्यातच गेली 121 वर्षे बनवली जाते.

सन 1893 पासून म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात उत्सवातील करमणूकीच्या कार्यक्रमात मेळ्यांचा फार मोठा सहभाग होता. या सर्व मेळ्यांच्या जाहीर कार्यक्रमांची सुरवात ग्रामदेवतेच्या गणेशोत्सवात हजेरी लावून होत असे. एकेका दिवशी साधारण 15 ते 20 मेळे कार्यक्रम करीत असत. ही प्रथा 1940 पर्यंत चालू होती. या काळात जोगेश्‍वरी देवस्थानचे ट्रस्टी श्री. बेन्द्रे व त्यांचे कुटुंबीय व देवस्थान परिसरातील नागरिकांचा सहभाग जास्त होता. सन 1940 नंतर बेंन्द्रे कुटुंबियांच्या मदतीला स्थानिक नागरिकातील जेजूरीकर बंधू, नकलाकार भोंडे, गणपतराव शेवाळे, रामभाऊ गोखले यांनी त्यांच्या कुटुंबीयासहीत हातभार लावला. 1969 पासून नवीन उत्साही तरुण कार्यकर्त्यांची फळी या उत्सवासाठी पुढे सरसावली.

यात जोगेश्‍वरी मंदिराचे विश्‍वस्त बेन्द्रे कुुटुंबीय, घोरपडकर कुटुंबीय, गाडगीळ बंधू, सामक बंधू, टिकार बंधू, तिखे बंधू, वाकडे बंधू, सोमण बंधू, भोंडे बंधू, बोडस बंधू, पिंपुटकर बंधूंनी कुटुंबीयासहीत भाग घेतला. यात 1983 ते 1992 व त्यानंतरच्या काळात आणखी तरुण कार्यकर्त्यांची भर पडली. यात प्रामुख्याने राजाभाऊ टिकार, प्रसाद कुलकर्णी, केदार करमरकर, प्रसाद पटवर्धन, अभिजीत बर्वे, विनीत एकबोटे, राजू बावडेकर, अनिरुध्द गाडगीळ, अजय टिकार, उमेश देशपांडे, सुनिल देशपांडे, सामक बंधू, खाडिलकर बंधूंसह आदींनी कुटुंबीयांसह सहभाग घेतला.

श्री तांबडी जोगेश्‍वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा उत्सवाचे 126 वे वर्ष साजरे करीत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव यंदा दि. 13 सप्टेंबर 2018 ते 23 सप्टेंबर 2018 या काळात साजरा होणार आहे. यानुसार 13 तारखेला श्रीं ची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या दिवशी सकाळी 10 वाजता नारायण पेठ – केळकर रस्ता (मंदार लॉजसमोर) येथून मिरवणूकीला आरंभ होऊन कुंटे चौक – लक्ष्मी रस्ता – गणपती चौकमार्गे मार्गस्थ होऊन दुपारी 12.30 वाजता जोगेश्‍वरी चौकातील मांडवात आगमन होईल.

पारंपारिक पद्धतीने श्रीं ची मूर्ती विराजमान असणारी चांदीची पालखी मंडळाचे कार्येकर्ते वाहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा मिरवणुकीमध्ये मंडळाचे पुरुष व महिला कार्यकर्त्यांबरोबर खालील पथकांचा समावेश असेल. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार हे आहेत.

– आढाव बंधूंचे नगारा वादन
– न्यू गंधर्व ब्रास बॅण्ड
– शिवमुद्रा ढोल ताशा पथक
– ताल ढोल ताशा पथक
– विष्णू नाद शंख पथक
– चांदीच्या पालखीत विराजमान असलेली श्रींची विलोभनीय मूर्ती

श्रींची प्राणप्रतिष्ठा रावेतकर ग्रुपचे श्री व सौ अमोल रावेतकर (प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक) यांच्या हस्ते दुपारी 12.30 पर्यंत संपन्न होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)