तांदुळ ,डाळीच्या रिकाम्या गोण्यांच्या पैशासाठी शिक्षण संचालकांचा तगादा

शिक्षक भारतीचा विरोध ः अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आश्‍वासन
नगर – शिक्षकांवर कामांचा बोजा वाढत असतानाच आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षकांना शाळेतील तांदळांच्या व डाळींच्या रिकाम्या गोण्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांचा सहा वर्षांचा तपशील पाठवण्यास सांगितले आहे. यामुळे राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षक शुक्रवार संध्याकाळपासून या गोण्यांचे गणित सोडवण्यात अडकले आहेत, याला शिक्षक भारतीचा कडाडुन विरोध असल्याची माहिती शिक्षक नेते सुनिल गाडगे यांनी दिली.
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून साधारण 200 विद्यार्थ्यांच्या शाळेला दोन महिन्यांना 12 ते 13 गोण्या धान्य पाठवले जाते. ते वापरून झाल्यानंतर रिकाम्या गोण्या एकत्र करून शिक्षकांनी त्याचा लिलाव करणे अपेक्षित असते. त्यातून मिळालेला निधी सरकारदरबारी जमा करायचा असतो. मात्र या गोण्यांचा दर्जा इतका निकृष्ट असतो की, त्या घेण्यास कोणीही तयार होत नाही. अनेकदा त्यांचा वापर पावसाळ्यात शाळांमध्ये पायपुसण्या म्हणून केला जातो, तर काही वेळा दुर्गम भागांतील शाळांमध्ये शहरातून सामान आणण्यासाठीही त्या वापरात आणल्या जातात. यामुळे त्यांचा लिलाव करून ते पैसे सरकारदरबारी देणे अनेक शाळांना शक्‍य होणारे नाही, यासाठी आज शिक्षक आमदार कपिल पाटील,शक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते सुनिल गाडगे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, विजय लंके, शरद धोत्रे, सुनिल जाधव, पदवीधर संघाचे प्रतिनिधी सुर्यभान काळे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, सचिव विभावरी रोकडे, बेबीनंदा लांडे , हनुमंत रायकर, सुदाम दिघे, जया गागरे, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, श्रीकांत गाडगे, संभाजी चौधरी, विलास गाडगे, मोहम्मद समी शेख, बापुसाहेब गायकवाड, सिताराम बुचकुल, संपत लबडे, जॉन सोनवणे, अशोक धनवडे, शैला कुटीनो, अनिता भालेराव, वैशाली आहेर, जयश्री कदम,राज्याचे प्राथमिक संघटनेचे उपाध्यक्ष दिनेश खोसे, जिल्हाध्यक्ष मुकेश गडदे, उषाताई येणारे, हिरा गाडे आदींनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची 20 तारखेला भेट घेऊन तात्काळ हे परिपत्रक मागे घ्या, शिक्षकांना विनाकारण त्रास देणे थांबवा, अधीच शिक्षकांवर अनेक कामांचा बोजा असताना हे नवीन खुळ कुठून डोक्‍यात आले, असे सुनिल गाडगे यांनी शिक्षण मंत्र्यांच्या निदर्शन आणुन दिले.
त्यानंतर कपिल पाटील म्हणाले कि, प्राथमिक शिक्षण संचालकांनी शुक्रवारी दुपारी सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना या गोण्यांच्या विक्रीतून आलेल्या सहा वर्षांच्या निधीचा तपशील शनिवारपर्यंत पाठवण्याचे आदेश दिले. परिणामी शिक्षकांची चांगलीच धावपळ सुरू आहे. दरम्यान, ही माहिती लोकलेखा समितीस सादर करावयाची असल्याने ती प्रथम प्राधान्याने पाठवावी, असे प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांचे लक्ष्य वेधले असता त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)