तांदळीत शॉर्टसर्किटने 4 एकर ऊस खाक

मांडवगण फराटा- तांदळी (ता.शिरूर) येथे रविवारी सकाळी 11ते 12च्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागून चार ते पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, रविवारी (दि. 7) वीज (लाईट) आल्यानंतर ट्रान्सफॉर्मर जवळ मोठा जाळ झाला. ट्रान्सफॉंर्मरच्या जवळच ऊस असल्याने आगीची ठिणगी ऊसावरत पडली. सर्व ऊस उन्हाचा तडाखा असल्याने पेट घेऊ लागला. स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रान्सफॉंर्मरमधून आगीचे लोळ बाहेर पडत असल्यामुळे आणि वेगाने वारा सुटल्याने बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले.
आगीमध्ये शेतकरी परशुराम तुकाराम बनकर, दादा सखाराम बनकर, मारुती सखाराम बनकर या शेतकऱ्यांचे ऊसाच्या पिकाचे जळून मोठे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केले. उभ्या पिकांत ट्रॅक्‍टर सुध्दा घातला, परंतु आग आटोक्‍यात आली नाही. झालेल्या घटनेची माहिती महावितरण कंपनीचे अभियंता मुलाणी यांना देण्यासाठी शेतकरी गेले असता ते कार्यालयात नसल्याचे सांगण्यात आले. तसेच गावकामगार तलाठी घाडगे यांनाही आग लागल्याबाबत माहिती दिली असता ताबडतोब झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला जाईल, असे त्यांनी सांगितले. शॉर्टसर्किटमुळे पूर्व भागात वारंवार आगीच्या घटना घडतात. यावर महावितरण कंपनीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. तसेच कारखान्याला गळीतासाठी जाणारा ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला, याची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीने स्वीकारून सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गदादे यांनी सर्व शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)