तांदळाचे पोषणमूल्य घटत आहे – टोकिया विद्यापीठ

close up of basmati rice

टोकियो : ब१, ब२, ब५ आणि ब९ या जीवनसत्त्वांचा पुरवठा करणाऱ्या तांदळाचे पोषणमूल्य दिवसेंदिवस घटत चालले आहे. वातावरणात कर्बवायूचे (कार्बन डायऑक्साइड) प्रमाण वाढत असल्याचा हा परिणाम असल्याचा निष्कर्ष टोकिया विद्यापीठातील शास्त्रज्ञ काझुहिको कोबोयाशी यांनी काढला आहे.

कोबोयाशी यांच्या मते, आणखी ५० वर्षांनंतर तांदळाचे पिक कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अधिक असलेल्या वातावरणात घेण्याची वेळ येणार आहे. त्यावेळी हवेत प्रतिदशलक्ष कणांमध्ये ५६८ ते ५९० कण कार्बन डायऑक्साइड असेल. त्यामुळे त्यावेळी तांदळात नैसर्गिकरीत्या आढळणारे लोह, जस्त, प्रथिने व वरील ब जीवनसत्त्वांचे प्रमाण घटलेले असेल.

अर्थात तांदळाच्या सर्वच जातींना कार्बन डायऑक्साइड वाढीचा फटका बसेलच असे नाही. त्यामुळे भावी काळात कर्बवायूच्या वाढीचा समर्थपणे मुकाबला करत पोषणमूल्ये कायम ठेवणारी तांदळाची नवी जात शोधून काढण्याचे आव्हान शास्त्रज्ञांसमोर असेल, असेही कोबोयाशी यांनी सांगितले आहे. या संशोधनासाठी चीन व जपान येथील संशोधनस्थळांवर तांदूळ खुल्या वातावरणात पिकवण्यात आला. यासाठी संशोधकांनी १७ मीटर रुंद प्लास्टिक पाइपचे अष्टकोन तयार करून त्यातून कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला गेला.

या वातावरणात तयार झालेल्या तांदळाचे प्रयोगशाळेत अध्ययन केले गेले. असा प्रयोग कोबोयाशी यांनी सर्वप्रथम १९९८मध्ये केला. तांदळाचे पिक कापणीला येईपर्यंत त्यांना जंगली श्वापदांचा त्रासही सहन करावा लागला. संशोधकांनी एकूण १८ प्रकारच्या तांदळाचे परीक्षण केले. त्यामध्ये जीवनसत्त्वांचे बदलते प्रमाण तपासून कार्बन डायऑक्साइडच्या परिणामांचा अभ्यास केला गेला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)