तांत्रिक शिक्षणातून उद्योजक निर्माण होतील

प्राध्यापक शेळके ः दहावी बारावीनंतर काय? विषयावर चांडोलीत मार्गदर्शन

मंचर-तांत्रिक शिक्षणाद्वारे जीवन सुखकर होऊन समाजात अनेक उद्योजक निर्माण होतील. समाजातील विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींची माहिती देऊन त्यांनी सिव्हिल इंजीनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आयटीआय, औषध निर्माणशास्त्र व इतर अनेक कोर्स विद्यार्थ्यांना भवितव्य उजाळणारे ठरत आहे, असे मत समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट बेल्हेचे विश्‍वस्त प्राध्यापक वल्लभ शेळके यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्‌युट बांगरवडी तसेच महात्मा गांधी विद्यालय भाग शाळा चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) यांच्या वतीने इयत्ता दहावी बारावीनंतर काय? या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापक सुनिल वळसे पाटील, विभागप्रमुख दशरथ काळे, अशरफ पठाण, रमेश महाडिक, शशिकांत तासगावकर, स्वाती उपार, प्राची चौधरी आदि शिक्षक उपस्थित होते. पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाबरोबर एखादे कौशल्य आत्मसात करावे. सायबर सेक्‍युरिटी, थ्री डी पेंटिंग, डेटाबेस मॅनेजमेंट फायर ऑडिट, सरफेस कोटिंग, पेंटिंग यासारखे अनेक नवीन अभ्यासक्रम आहेत त्याचाही विचार विद्यार्थ्यांनी करावा. नोकरी मिळविण्याबरोबरच यशस्वी उद्योजक घडविणे हासुद्धा तंत्रशिक्षणाचा हेतू आहे. विद्यार्थ्यांनी उच्च स्वप्न पहावी, ती पूर्ण करण्यासाठी निष्ठेने प्रामाणिकपणे कष्ट करावे असेही विचार यावेळी प्राध्यापक रतिलाल बाबेल यांनी मांडले. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मुंबई पुणे विभागाच्या प्रणाली विश्‍लेषक शितल फरताडे यांनी मार्गदर्शन केले. प्राध्यापक महेश पोखरकर यांनी प्रवेश प्रक्रिया, शासकीय व अशासकीय विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या याविषयी माहिती दिली प्रवेश घेताना विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सुट्टीत कोण कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत याबाबत प्राध्यापक महेश पोखरकर यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन केशव टेमकर यांनी केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)