तांत्रिक बिघाडामुळेच जलउपसा केंद्रातील वीज पुरवठा खंडित

निगडी – रावेत येथील जलउपसा केंद्रातील अंतर्गत विद्युत यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा मंगळवारी (दि. 26) पहाटे अडीच तास खंडित झाला होता. महावितरणकडून या जलउपसा केंद्राला सुरळीत वीज पुरवठा सुरु होता, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

मंगळवारी रावेत जलउपसा केंद्राचा सुमारे अडीच तास वीज पुरवठा खंडित राहिल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. महापालिकेने महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत झाल्याचा दावा केला होता. त्यावर महावितरणने प्रसिध्दी पत्रकाव्दारे हा वीज पुरवठा महावितरणमुळे नव्हे तर या केंद्रातील लाईटींग अरेस्टर फुटल्यामुळे खंडीत झाल्याचे म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महावितरणकडून वीज पुरवठा करणाऱ्या 22 केव्ही वाहिनीचा वीज पुरवठा दोन वेळा एकूण 9 मिनिटांसाठी खंडित राहिला होता. तथापि, जलउपसा केंद्रातील वीज मीटरनंतरच्या अंतर्गत विद्युत यंत्रणेसह रोहित्रात बिघाड झाल्यामुळे अडीच तास वीज पुरवठा खंडित होता. महावितरणकडून रावेत जल उपसा केंद्राला एक्‍सप्रेस वाहिनीद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. या वाहिनीवरुन वीज खंडित झाल्यास अन्य पर्यायी वाहिन्यांद्वारे वीज पुरवठा करण्याची सोय उपलब्ध आहे, याकडे महावितरणने महापालिकेचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)