तांत्रिक कार्यक्षमतेत विघ्नहरला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

निवृत्तीनगर- जुन्नर तालुक्‍यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्‍टरीज, नवी दिल्ली यांचेकडून गाळप हंगाम 2017-18 साठीचा देश पातळीवरील उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ येत्या 10 सप्टेंबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लिमिटेड यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे, अशी माहिती विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी सांगितली.
या पुरस्काराबद्दल विघ्नहरचे चेअरमन सत्यशिल शेरकर म्हणाले, विघ्नहरने मागील गळीत हंगाम सन 2017-18 मध्ये उपलब्ध तांत्रिक कार्यक्षमतेचा पूर्ण क्षमतेने वापर करत संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे म्हणजेच 10 लाख 50 हजार 450 मेट्रिक टन इतक्‍या ऊसाचे गाळप केले आहे. तसेच 12 लाख 34 हजार 700 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. त्याचबरोबर 11.75 टक्‍के साखर उतारा राखण्यात यश मिळविले. तसेच सहवीजनिर्मिती आणि डिस्टीलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवून सहवीजनिर्मिती प्रकल्पातून 4 कोटी 40 लाख 67 हजार युनिट वीज निर्यात केली असून डिस्टीलरीमधून 55 लाख 25 हजार 500 लिटर अल्कोहोल आणि 11 लाख 21 हजार 335 लिटर इथेनॉलची निर्मिती केलेली आहे. विघ्नहर कारखान्याने तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करत तसेच कारखाना पारदर्शकपणे आणि काटकसरीने चालविल्यामुळे देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे सर्व सभासद बंधू-भगिनी, ऊस उत्पादक, अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे तसेच तरुण वर्गाच्या सहकार्यामुळेच शक्‍य झाले आहे, असे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)