तांडा सुधार योजनेअंतर्गत कोटींचा निधी – आ. राजळे 

शेवगाव मधील 7 तर; पाथर्डीतील 10 गावे

पाथर्डी – वसंतराव नाईक तांडा-वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यांतील विविध विकासकामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. यामध्ये पाथर्डी तालुक्‍यातील 10 गावांचा, तर शेवगावमधील 7 गावांचा समावेश आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याकडे या निधीसाठी पाठपुरावा केला होता, असेही राजळे यांनी सांगितले.

-Ads-

पाथर्डी तालुक्‍यातील लांडकवाडी जॅक्‍सनतांडा येथे समाजमंदिर बांधणे सात लक्ष रुपये, धनगरवाडी रूपालाचातांडा येथे पाणीपुरवठा कामासाठी सात लक्ष रुपये, जाटदेवळे येथील शकूचातांडा येथे समाजमंदिरासाठी सहा लक्ष रुपये, बोरसेवाडी पवारतांडा समाजमंदिर बांधणे सात लक्ष रुपये, पत्र्याचातांडा, हरीचा तांडा येथे समाजमंदिर बांधणे सात लक्ष रुपये, पत्र्याचातांडा (वाघोली) येथे पाणीपुरवठा कामासाठी चार लक्ष रुपये, आल्हनवाडी काकडदरा तांडा येथे पाणीपुरवठा कामासाठी सात लक्ष रुपये, आल्हनवाडी वाघदरातांडा येथे समाजमंदिर बांधण्यासाठी सात लाख रुपये, आल्हनवाडी मालदारातांडा येथे समाजमंदिर बांधण्यासाठी चार लक्ष रुपये, कोरडगाव खंडोबानगर येथे समाजमंदिर बांधणे चार लक्ष रुपये, या कामांना मंजुरी मिळाली आहे.

शेवगाव तालुक्‍यातील शेकटे खु. चिकणीतांडा येथे समाजमंदिर बांधणे सात लक्ष रुपये, शेकटे खु. बाळूबाईतांडा येथे समाजमंदिर बांधणे सात लक्ष रुपये, लाडजळगाव कोकटवाडीतांडा येथे पाणीपुरवठा करणे सहा लक्ष रुपये, लाडजळगाव बारापट्टातांडा येथे पाणीपुरवठा करणे, सहा लक्ष रुपये, राणेगाव लमाणतांडा पूर्व येथे समाजमंदिर बांधणे सात लक्ष रुपये, राणेगाव लमाणतांडा पश्‍चिम येथे समाजमंदिर बांधणे सात लक्ष रुपये, या कामांना मंजुरी मिळाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)