तहसील कार्यालयावर प्रहार अपंग संघटनेचा आंदोलनाचा इशारा

अकोले- अपंगांच्या सर्वांगीण विकासाठी व्हावा व अपंगांना न्याय मिळावा या मागणीसाठी येत्या 16 तारखेला तहसील कार्यालयावर आंदोलन छेडले जाणार आहे, अशी चौधरी व मुरुमकर यांनी माहिती दिली.

अपंगांच्या हक्‍कांची अंमलबजावणी व्हावी, व्यवसायासाठी जागा मिळावी, 3 टक्‍के निधी मिळावा, पेन्शन योजना चालू व्हावी व अन्य मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यापासून प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना अकोलेच्या वतीने तहसीलदार, नगरपंचायतचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या सोबत बऱ्याच वेळा बैठका व पत्रव्यवहार करण्यात आला आहे. शिवाय तालुक्‍यातील सर्वच ग्रामपंचायत, नगरपंचायतमध्ये अपंगांचा 3 टक्‍के निधी खर्च होत नाही. अपंगांना फक्‍त गाजर दाखविण्याच काम केले जात आहे. शिवाय आश्‍वासनांची फक्‍त खैरात देऊनच “बोलाची कढी अन्‌ बोलाचाच भात’ हीच नीती राबवली जात आहे.

आतापर्यंत हे अधिकारी अपंगांना असेच गृहीत धरत आल्यामुळे त्यांची सहनशक्‍ती आता संपलेली आहे. त्यामुळे येत्या बुधवारी 16 ऑगस्ट रोजी अकोले तालुक्‍यातील प्रत्येक अपंग आपल्या हक्‍काच्या पेन्शनसाठी, 3 टक्‍के निधीसाठी तरी अपंग बंधू भगिनींनी आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हावे, असे आवाहन मच्छींद्र चौधरी, अमर मुरुमकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)