तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर दहिवडीतील आंदोलन मागे

दहिवडी –  माण तहसील कार्यालयासमोर विविध मागण्या पूर्ण करण्यासठी गेले दोन दिवस सुरु असलेले दहिवडीतील आंदोलन तहसीलदार बाई माने यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात भाजपाचे अनुसूचित जाती माण तालुका अध्यक्ष मंगेश खरात, सरचिटणीस अशोक पवार यांच्यासह विकासनगर येथील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले होते.

शासनाने भूमीहीन मजुरांना घरकुलासाठी 100 गुंठे जागा 1987 साली दिली होती, त्यामध्ये त्यातले 14 गुंठे क्षेत्र सध्याच्या मोजणी प्रमाणे कमी भरते. यासाठी क्षेत्र पुन्हा मोजून त्त्यातील अतिक्रमण काढण्यात यावे याबाबतचे पत्र भुमिअभिलेख कार्यालयाला दिले. त्यानंतर भूमीअभिलेख कार्यालयाने मोजणी करून त्याचे नकाशे तयार करून हद्दी कायम करण्यात येतील असे लेखी आश्‍वासन आंदोलनकर्त्यांना दिले. दहिवडी नगरपंचायतिच्यावतीने झालेल्या गटर व रस्त्याचे कामांचे परीक्षण करण्यात येईल दलित सुधार वस्ती मध्ये निधी टाकण्या संदर्भातील करण्यात आलेल्या ठरावाच्या प्रती देण्यात आल्या.

पंतप्रधान आवास योजनेतील घेण्यात येणाऱ्या पावत्या यापुढे आकारण्यात येणार नाहीत व घेतलेले पैसे परत करण्यात येतील असे लेखी आश्‍वासन मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी दिले. त्या नंतर आंदोलन मागे घेतले. उपोषणास माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर, जिल्हा नियोजन सदस्य बाळासाहेब खाडे, डॉ. उज्वलकुमार काळे, बापूसाहेब साखरे, दादासाहेब शिंदे, धिरज दवे यांनी आंदोलनकर्त्यांना दिलासा दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)