तहसीलच्या आवारातून वाळूचा ट्रक पळविण्याचा प्रयत्न

file photo

महसूल कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

नेवासा: तहसीलदारांनी पकडलेला वाळूचा ट्रक तहसील आवारातून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाळूचोरांना महसूल कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना धक्काबुक्की करण्याची घटना नेवासा येथे घडली.
या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा बादल कैलास परदेशी (वय 26) व संतोष कचरू परदेशी ( वय 28 रा. नेवासा फाटा) या दोघांवर दाखल करण्यात आला असून त्यांना नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत खडका येथील कामगार तलाठी आण्णा भीमराज दिघे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, दि. 7 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार सुधीर पाटील यांनी फोन करून पिंप्री ते खडका या रस्त्याने वाळूचा ट्रक येत असल्याचे सांगितले. त्यानंतर मी व कोतवाल लक्ष्मण मोरे यांनी मोटरसायकलवर जाऊन ट्रक अडविला. त्याचवेळी तहसीलदार सरकारी गाडीतून कामगार तलाठी पोपट गायकवाड, मुकींदपूर, कामगार तलाठी बद्रीनाथ कमानदार, नेवासा शिपाई बंडू सोनवणे, चालक संतोष पडवळ यांचेसह आले. ते खाली उतरताच ट्रक चालक तसेच कामगारांनी पळ काढला. त्यानंतर दोन ब्रास वाळूसह ट्रक ताब्यात घेतला.

त्यानंतर पुढील कारवाईसाठी ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात लावला असता बादल परदेशी व संतोष परदेशी यांनी ट्रक पळविण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही ट्रककडे धाव घेतली. त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्यांना अडविले असता त्यांनी धक्काबुक्की केली. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)