तहकुबीचे “गृहण’ सुटले: अर्थसंकल्पाची चिरफाड

पिंपरी- तहकुबीचे ग्रहण लागलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी 2018-19 आर्थिक वर्षाचा 5 हजार 262 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अखेर मंगळवारी (दि.27) मंजूर करण्यात झाला. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी केलेल्या तब्बल 1 हजार 112 उपसूचनांपैकी ग्राह्य ठरलेल्या 981 उपसूचनांसह हा अर्थसंकल्प मंजूर झाला. मात्र, उपसूचनांमुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची पुरती चिरफाड करण्यात आली. तसेच, विकासकामांच्या नियोजनावर पाणी फेरले गेल्याने महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.

महापालिकेच्या 2018-19 या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पावर मागील मंगळवारी (दि.20) सुमारे सात तास चर्चा झाली. चर्चेअंती सत्ताधारी भाजपने नवीन कामे व वर्गीकरणाच्या एकूण 616 कोटी रुपयांच्या 1 हजार 112 उपसूचना घुसडवून अर्थसंकल्पावर पाऊस पाडला. त्यापैकी मुख्य लेखापल यांनी 117 उपसूचना अग्राह्य करून 995 उपसूचना ग्राह्य असल्याचे निश्‍चित केले. त्या सभेपुढे मांडल्यानंतर आणखी 14 उपसूचना अस्वीकृत करून 981 ग्राह्य उपसूचना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी स्विकारल्या. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी अर्थसंकल्प स्वीकृत झाल्याचे जाहीर करत त्याला मंजुरी दिली.

दरम्यान, आयुक्त हर्डीकरांनी अर्थसंकल्प सादर करताना यापुढे टोकन पध्दत बंद केल्याचे सांगितले. त्यावरून सत्ताधा-यांनीही त्यांची पाठ थोपटली होती. मात्र, प्रत्यक्षात अर्थसंकल्पाला मंजुरी देताना आयुक्तांच्या धोरणाला केराची टोपली दाखविली आहे. नगरसवेकांनी टोकन तरतुदीसाठी तब्बल 444 कामे उपसूचनांव्दारे अर्थसंकल्पात सुचविली आहेत. या कामासाठी कोणतीही तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. तर, उर्वरित कामांसाठी सुमारे 598 कोटी रुपयांची मागणी उपसूचनाव्दारे केली आहे. त्यापैकी शहर विकास आराखड्यातून 86 कोटी, तर अखर्चित म्हणजे शिल्लक निधीतील 511 कोटी रुपयांचा समावेश आहे. तर, अर्थसंकल्पातून 91 कोटी रुपये वर्गीकरणाच्या माध्यमातून उपसुचनांव्दारे वळविण्यात आले आहेत. तर, केंद्र, राज्य सरकारच्या शासकीय योजनांच्या तरतुदीमध्ये सत्ताधा-यांनी कोणताही बदल केलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)